Top News

मातृ शक्तीला समर्पीत समाजसेवीका,कवीयत्री रेखा निमजे यांचा लेखनीतुन सादर केलेली कविता.

 मातृ शक्तीला समर्पीत समाजसेवीका,कवीयत्री रेखा निमजे यांचा लेखनीतुन सादर केलेली कविता.

माय माझी 

( विदर्भ माझा न्युज 24 - संपादक ) संजय घुगलोत,नागपुर  :- 

माय माझी मायेचा पाझर

शी फेडू माय तुझे उपकार?

होतीस तु गरोदर

दिलास मला जन्म

आहेत तुझे उपकार आजन्म (२)

माय माझी मायेचा पाझर..!!१!!

          ज्या कुशीत लहानचे मोठे झाल्यावर,(२)

क्षणाचाही विचार न केल्यावर (२)

झोकुन दिलेस मला तु दुसऱ्यावर (२)

कशी फेडू माय तुझे उपकार

माय माझी दयेचा सागर (२)

कशी फेडू माय तुझे उपकार !!२!!

    कबाड कष्ट केल्यावर (२)

सांभाळलेस तु घर परिवार  

स्वतःची पर्वा न करताच 

किती पाहिलेस तु पाणी पाऊस (२)

माय माझी करुणेची तु कणखर (२)

कशी फेडू माय तुझे उपकार, !!३!!  

       अशीच सोडून जाशील तू आम्हास - अ

कशी सांगू तूच आमचा आधार

टिपून राहतील डोळे आमचे आभाळावर ,

येशील का माय माझी तु क्षणभर - अ

माय माझी आम्ही तुझी पाखर

कशी फेडू माय तुझे उपकार !!४!!

      तुझेच आशीर्वाद आहेत मनभर - अ(२)

कशी सांगू माय माझी फिरते घर भर

माय माझी मायेचा पाझर - अ

माय माझी दयेचा सागर - अ

माय माझी करुणेची तु कणखर

कशी फेडू माय तुझे मी उपकार ?

        माय तुझे उपकार ?

        माय तुझे उपकार ?

        माय तुझे उपकार.?

कवीयत्री :- रेखा निमजे, नागपुर 

मो.नं.+9177690 34734
Previous Post Next Post