Top News

चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग.

 चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग. 


दोशी अधिकाऱ्याला तातकाळ बडतर्फ करण्याची राजू झोडे यांची मागणी.  

     



 (विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतीनीधी)संदीप तेलंग चिचपल्ली,जि.चांदा :-  आशियातील सर्वात मोठा बांबू संशोधन प्रशिक्षण प्रकल्प चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली येथे निर्माण करण्यात येत होते. बांबू चा वापर करून ही प्रशासकीय इमारत उभी केली होती. मा. आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. आज दि. 25 , दुपारी प्रकल्पाचे छतावर आगीचे लोळ व   धूळ लोकांच्या नजरेस पडले. संपूर्ण इमारतीला  आगी ने घेरलेले होते. इमारतीचा संपूर्ण आजूबाजूला झुडपी जंगल असल्यामुळे सोसाट्याचा वाऱ्यांना  इमारतीला हेरून घेतलेले होते. निश्चित ही आग कशामुळे लागली यांचे अजून नेमके कारण कळले नाही. ही आग विझवण्यासाठी चंद्रपूर येथून महानगरपालिकेच्या दोन अग्निशामन वाहनाला पाचारण करण्यात आले. पुढचा काही काळामध्ये त्या इमारतीचे उद्घाटन तयार करण्याचे अपेक्षित होते. आग लागल्याची माहिती कळताच चंद्रपूर येथून वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहे व पुढील तपास करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व ढिसाळ नियोजनामुळे  बांबू प्रकल्पाला मोठी आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तसेच शासनाचे करोडो रुपये व्यर्थ गेलेले आहे. त्याला संबंधित जबाबदार अधिकारी असून दोषी अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी  राजू भाऊ  झोडे   यांनी केलेली आहे.

Previous Post Next Post