महसूल विभाग पथकाची मोठी कारवाही.
रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरपकडला.
परिविक्षाधीन तहसीलदारांची धडाकेबाज करावाही.
मदनापुर येथील रेती तस्करी करणारे दोन तर सावरखेडा येथील एक ट्रॅक्टर पोलीस पाटील च्या ताब्यात.
(विदर्भ माझा न्युज 24 - प्रतीनीधी) माहूर :- तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्याची मोहीम जोरात सुरु केली असून या मोहिमे अंतर्गत महसूल विभागाच्या पथकाने व नायब तहसीलदार यांनी दि.24रोजी सायंकाळी 6ते7वाजताच्या दरम्यान सायफळ व मदनापुरा ला लागून असलेल्या कोळी शिवारात मदनापूर येथील दोन सोनालीका ट्रॅक्टर व सावरखेड येथील एक सोनालीका ट्रॅक्टर असे तीन ट्रॅक्टर तर त्याच्यातील दोन ट्रॅक्टर विना नंबर चे व एक MH.29.AK.2782.नंबर चा असल्याची माहिती मिळाली आहे.
रेती तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी परिविक्षाधीन तहसीलदार यांच्या आदेशानुसार सायफळ गावाचे तलाठी फड साहेब व मदनापूर येथील तलाठी भानुदास काळे यांनी टीम तयार करून सायफळ या गावातून पोलीस पाटील हेमंत गावंडे यांना सोबत व दुचाकि घेऊन नदीवर गेले असता त्यांनी पाहतात कि रेती तस्करी नदीपात्रात ट्रॅक्टर पाण्याच्या आत टाकून वाळू तस्कर चालू आहे. त्यांनी ट्रॅक्टर चालकांना आवाज देतात ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालू करून पळायला लागले वेळ न घालतात तलाठी फड साहेब व कांबळे साहेब यांनी पाण्यात उड्या मारून ट्रॅक्टर चालकांना पकडण्यासाठी पोहून ट्रॅक्टर जवळ पोचले पण तोपर्यंत ट्रॅक्टर चालक नदीपात्रातून पोहून रस्त्याच्या बाहेर निघाल्याने ट्रॅक्टर चालक पळून फरार झाले तलाठी फड साहेब कांबळे साहेबानी ट्रॅक्टर चालू करून पाण्याच्या बाहेर थडीला आणून टेकवले.
एक ट्रॅक्टर खराब झाल्याने तिथेच, सोडून चाबी घेऊन आले. ट्रॅक्टर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. एका ट्रॅक्टर वर 1 लाख 27 हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे, तर असे तिन्ही ट्रॅक्टर दंड लावण्यात आले आहे. महसूल विभाग च्या टीमने ट्रॅक्टर जप्त करून पोलीस पाटील यांच्या घरी आणून लावले आहे. परिविक्षाधीन तहसीलदार यांच्या नेतृत्वा खाली कारवाही करण्यात आली, त्यावेळी मदनापुर येथील तलाठी भानुदास काळे सायफळ येथील तलाठी फड, व त्यांची दहा जणांची टीम उपस्थित हाती. सदरील तपास सायफळ गावातील पोलीस पाटील हेमंत गावंडे करीत आहे.


