Top News

जानुण घेऊ या विदर्भतील पर्यटन स्थळे. - भाग ३

 

जानुण घेऊ या विदर्भतील पर्यटन स्थळे. - भाग ३


वडधम जिवाश्म पार्क.




(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य संपादक) वडादम,जि.गडचीरोली :-  वडधम जीवाश्म पार्क हे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडादम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 189 कि.मी. अंतरावर स्थित आहे. सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून 19 कि.मी. अंतरावर आहे.

हौशी पुरातत्त्वतज्ज्ञांच्या एका गटाने  विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी प्रभावित झालेल्या सिरोंचा तालुक्यामधील वडदम या गावाजवळ प्राचीन असलेल्या अवशेषांचा शोध लावला आहे, ज्याचा त्यांनी लाखो वर्षांपूर्वीचा दावा केला आहे आणि हे प्राचीन अवशेष डायनासोर या प्राण्याचे मानले जातात.सिरोचाचा देशातील पाच ठिकाणी समावेश आहे जेथे डायनासॉरचे जीवाश्म मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. 1959 मध्ये तेलंगाना राज्याच्या सीमेजवळ असलेलेया कोथापल्ली-पोचमपल्ली या गावात गोदावरीच्या खो-याजवळ एक पूर्ण वाढ झालेला डायनासॉरचा सापळा सापडला. तेव्हापासून, सदर जीवाश्म कोलकातामधील एका संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.

वडधम पार्क मधील जिवाक्ष्म.







वडधम जिवाश्म पार्क मधील डायनासोर चि कलाकृती.




कसे पोहोचाल?:

विमानाने

विदर्भाची राजधानी नागपुर येथिल विमानतळ 380 किमी अंतरावर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वेस्टेशन चांदा व बल्लारशाह येथे आहे.

रस्त्याने

वडदम जीवाश्म पार्क हे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडादम या गावाजवळ असरअल्ली मार्गावर वसलेले आहे. सदर ठिकाण दक्षिणेकडे गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासून 189 कि.मी. अंतरावर स्थित आहे. सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणापासून 19 कि.मी. अंतरावर आहे. येथे जाण्याकरिता सिरोंचा या तालुक्याच्या ठिकाणावरून राज्य परिवहन महामंडळ ची व खाजगी बससेवा उपलब्द आहे.



Previous Post Next Post