Top News

सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांची धडाकेबाज कारवाई.

 सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांची धडाकेबाज कारवाई.


सिंदखेड पोलीसांची दहेली येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड.




(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,दहेली,जि.नांदेड :-   सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे दहेली येथे अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनि छापा मारून सुरेश चीनया दिसेवार यांच्या विरुद्ध अवैध मटका जुगार चालवीत असल्याने तेथे धाड टाकली त्यांचे कडून एक हजार दोनशे साठ रुपये (१२६०/-) व साहित्य जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत उमेश दर्शनलाल जयस्वाल हा अवैध रित्या देशी दारू विकताना पकडला असून त्याच्याकडून 25 देशीच्या दारू बाटल्या किंमत एक हजार दोनशे रुपयेच्या (१२००/-) जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. याकामी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जयसिंग राठोड,जमादार बबन गुहाडे, नदंगावे, सोनसळे, मोकळे यांनी ही कारवाई केली.पूढील तपास जमादार गुहाडे हे करीत आहेत.

Previous Post Next Post