अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसमोर आज आंदोलन.
'महाविद्यालये सुरू करा' अभाविप चे चंद्रपूर तसेच राज्यभरात आंदोलन.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,चांदा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोरोनामुळे बंद असलेले महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन निवेदने तसेच जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला निवेदन व महाविद्यालयांसमोर अभाविपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे मागील ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या शाळा, मॉल, दारूची दुकाने, आणि इतर अनेक गोष्टी सुरू करायला सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालये अद्याप बंद का ठेवण्यात आली आहेत, असा सवाल उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांसमोर आज आंदोलन करण्यात आले.
महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन पद्धतीचा उपयोग करत अभ्यासक्रम घेतला जातो, मात्र त्यात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय निट समजत नाही. ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. या सर्व अडचणी लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी महानगर सहमंत्री शैलेश दिंडेवार, रोहित खेडेकर, सचिन केंद्रे अमोल मदने, जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले,यशवंत पवार, सचिन लांडगे,मंदार झाडे, अंकुश एकरे,वामन मुंडे,पराग दिंडेवर,निखिल गोरे,रोहन चालेकर बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.



