कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्यांची विष पाशन करून आत्महत्या...
( विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतिनीधी )मनोज श्रीहरी गोरे, जि.चांदा :- कोरपना तालुक्यातील निमनी येथील श्री मंगेश तिकट या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात विष घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सुत्रांन कळुण मिळालेल्या माहीती नुसार
सतत झालेल्या नापिकी मुळे कर्जाचा डोंगर झाला कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला, त्यातच कुटूंबाचे उदरनिर्वाह त्यामुळे कर्ज आणि कुटुंब कसे सांभाळायचे यांची चिंता सतवत होती,त्यामुळे मंगेश तीकट यांनी आपल्या शेतात विष घेतले त्याला गडचांदूर तेथील ग्रामीण रुग्णालयात नेताच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांच्या पच्छात आई, वडील ,पत्नी आणि 3 वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे ,परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आणि गावात त्यांचा मृत्यूने हळहळ सुटली .
