सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपुर जिल्हा शाखाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मा.पंतप्रधान मंत्री यांना निवेदन.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक )गौतम कांबळे,चांदा :- विषय: २०२१-२०२२ च्या केन्द्रीय बजेटमध्ये शिष्यवृत्तीची तरतूद करण्यासाठी मोदी सरकार संसदेत १ फेब्रुवारीला संसदेत बजेट सादर करणार आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती स्वातंत्र्यपूर्व काळात मागास विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती, ती बंद करणेचे केन्द्र सरकारने ठरविले आहे.
६२ लाख विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत, त्यांना Scholarship पासून वंचित ठेवणेचे काम केन्द्र सरकार करीत आहे याविरूध्द धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात कलेक्टर कार्यालयात मा. यशवंत तुळशीराम धाईत (सामान्य विभाग) यांना मा निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित सम्यक विद्यार्थी आंदोलन चे अंकित खोब्रागडे चंद्रपूर तालुका अध्यक्ष, नरेश आलम चंद्रपूर तालुका संघटक, तुषार साखरकर ऊर्जा नगर शाखा अध्यक्ष, प्रवीण कांबळे, नारायण येंगडे, अक्षय ढोरेकर, अमर लव्हराळे, मयुर डांगे, रिझवान कुरेशी, अक्षय लोहकरे, स्मित देवगडे, प्रशिक खांडेकर, नैना कांबळे ,जय कांबळे, इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थी होते.
