Top News

मौजा बोर्डा दीक्षित तालुका पोंभुर्णा येथील सामाजिक सभागृहाचे वरील पुसले स्व. मा.सा.कन्नमवार हे नाव पूर्ववत देण्यात यावे.

 मौजा बोर्डा दीक्षित तालुका पोंभुर्णा येथील सामाजिक सभागृहाचे वरील पुसले स्व. मा.सा.कन्नमवार हे नाव पूर्ववत देण्यात यावे.



सभागृह वरील मा.सा.कन्नमवार हे नाव बेकायदेशीररित्या पुसण्यास भाग पाडणाऱ्या मा. ठाणेदार पोंभुर्णा यांना त्वरित निलंबित करण्याची यावे- श्री. संदीप कारमवार (उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुल)                         



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,पोंभुर्णा,जि.चांदा :- मौजा बोर्डा दीक्षित तालुका पोंभुर्णा येते ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव क्रमांक १०/१ नुसार सामाजिक सभागृहाला स्व.मा.सा.कन्नमवार हे नाव देण्याचे दिनांक २५ जानेवारी २०१९ रोजी देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले होते. दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सामाजिक सभागृहाला स्व.मा.सा.कन्नमवार हे नाव देण्यात आले, परंतु विरोधक विरोध करून दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी पोंभुर्णा  येथील ठाणेदार समक्ष सभागृहाचे नाव पुसण्यात आले, या प्रकारामुळे समाजाचा अस्मितेला धक्का बसलेला आहे. 

ज्या ठाणेदार यांनी समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्या ठाणेदाराला निलंबित करून व सभागृहाला नाव पूर्ववत द्यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती मुल संदीपभाऊ कारमवार चे उपसभापती यांनी निवेदनाद्वारे माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर यांच्याकडे केली आहे.

Previous Post Next Post