राजु यादव यांची हत्या करणार्या आरोपींना राजुरा पोलीसांनी केली अटक.
( विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक )रोहीत लोनारे,राजुरा,जि.चांदा :- राजुरा येथील वर्दळीचे ठिकाण असेलल्या नाका नं 3 परिसरात हेयर सलून मध्ये काल सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास कोळसा व्यावसायिक राजू यादव - 45 रा. रामपूर यांच्यावर गोळ्या झाळून हत्या केली
तर आरोपींना अवघ्या काही तासातस पकडण्यात यश प्राप्त झाले. आरोपी नामे चंदन सितलाप्रसाद सिंग (वय ३०) जवाहर नगर, सत्यंद्र कुमार परमहंस सिंग (वय २८) हनुमान नगर रामपूर अशी असून यावर कलम ३०२, ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. तर घटनेप्रसंगी आरोपींनी वापरलेली दुचाकी MH34 BT-2524 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाई राजुराचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजासिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलिस शिपाई श्रीकांत चन्ने, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे आणि टिम करीत आहेत. दरम्यान खुन झालेल्या मयुर सलून आणि आरोपी राहत असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
