Top News

नाली बांधकाम नाही झाल्याने सायफळ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात ‌

 नाली बांधकाम नाही झाल्याने सायफळ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

रस्त्यावर वाहत आहे सांडपाणी 


 सायफळ ग्रामपंचायतीचे गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष 



(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,माहुर :- माहूर तालुक्यात असलेल्या नदीकाठी डोंगराळ भागात  वसलेल्या सायफळ या गावात अद्यापही नाल्या बांधकाम झालेला नाही आहे.  घरातील सांडपाणी रस्त्यावरून  वाहत आहे.  त्यामुळे सायफळ या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील नागरिकांनी सरपंचांना व ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार सांगू नहि. नागरिकांच्या बोलण्यावर  ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेले आहे असे दिसत आहे. ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे कि शौच खड्डे आपल्या घरात बनवा पण गावातील नागरिकांचे म्हणणे आहे कि शौच खड्डया साठी जमीन कडक असल्याने खड्डेच होत नाही. अश्या वेळी रस्त्यावरून वाहत असलेला सांडपाणी खुल्या जागेत जमा होत आहे. गावात  नाली बांधकाम नसल्याने याचा सायफळ या गावातील नागरिकांना नाहक त्रास झेलावा  लागत आहे.  खुल्या जागेत पाणी साचून राहत असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे, दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडावे लागत आहे, दूषित पाण्यामुळे  गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या समस्येकडे  गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, मागील पाच वर्षापासून सायफळ  या गावात कोणत्याही प्रकारचे विकास काम झालेले नाही आहे, सरपंच पदाचे पाच वर्षे खतम होत असतानाही आतापर्यंत या ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आलेले आहे. असा आरोप नागरिकांन कडून होत आहे. ग्रामपंचायतीच्या निर्लज्ज धोरणामुळे हा गाव एवढा मागे राहिलेला आहे असा आरोप नागरिकांकडून होत आह. आतापर्यंत गावात कोणत्याही प्रकारचे, विकास कामे झालेले नाही असा आरोप शरद कुडमते सामाजिक कार्यकर्ता यांनी ग्रामपंचायतीवर लावलेला आहे. कोणत्याही निधीतून फंड उपलब्ध करून गावात नाली  बांधकाम करून द्यावा अशी नागरिकांन व युवा सामाजिक कार्यकर्ते शरद कुडमते कडून व  राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष व तसेच सामाजिक कार्यकर्ते राजीक शेख  यांनी ग्रामपंचायतीला मागणी केली आहे.

Previous Post Next Post