Top News

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वीज मंत्र्याच्या घराला घेराव.

ऊर्जा मंत्र्यांचा घराजवळ मोर्चा बेझन बाघ ईथे आंदोलनकर्ते पोहचताच सर्वात प्रथम बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार शहर अध्यक्ष रोहीत लोनारे‌ यांना‌ पोलीसंनव्दारे अटक.


बल्लारशाह तालुक्यातुन  विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.


३०० ते ३५० विदर्भवाद्यांना‌ पोलीसांनी केली अटक


(विदर्भ माझा न्युज 24 उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह,जि.चांदा(चंद्रपुर) :-  काल दि.४-१-२०२१ ला विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ,कोरोना काळातील वीज बिल महाराष्ट्र सरकार ने भरावे,२०० युनिट पर्यंत वीज मोफत करा,नंतरचे विज दर निम्मे करा, स्थिर आकार,मिटर भाडे,विज वहन कर,भार-अधीभार आदी बंद करा,शेतीपंपाची लोडशेडींग बंद करा,शेतिला पुर्ण वेळ पुर्ण दाबची विज द्या,शेती पंपाचे विज बिल मुक्त करा,विदर्भातील शेतकर्यांना गुलाबी बोंड अळी नुकसानीची व अतिद्रृष्टीची नुकसान भरपाई २५हजार रुपये प्रती एकर सरसकट घ्या व ६५ मि.ली. पावसाची अट रद्द करा,खोडकीडी,मावा,तडतुडे व परतीचा पाऊस व वादळी वार्यामुळे नुकसान झालेल्या धान पीकास प्रती एकर रू.२५हजार घ्या, साप हा वन्य प्रानी असल्या मुळे साप चावून मरणार्या व्यक्तीच्या कुटूंबास इतर वन्य प्रान्या प्रमाने मदत देण्यात यावी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मान‌ करण्यात यावे या सर्व मागण्यांसाठी सोमवारी विदर्भ राज्य आंदोलन समीती तर्फे संवीधान चौकातुन विदर्भ मार्च निघाला ५००० पेशा जास्ती विदर्भवाद्यांचा हा मोर्चा बेझन बाघ जवळ गेल्या वर पोलीसांनी मोर्चा अडवीला. 

प्रचंड पोलीस ताफा तैनात करून कठडे लावले व पोलीसांनी प्रचंड दडपशाही केली मोर्चे करत्यांनी नितीन राऊत यांना बोलवा अशिमागनी करीत पोलीसांचा अडथळा ओलांडन्याचा प्रयत्न केला असता,पोलीसांनी सोम्य बळाचा वापर केला आनि मोर्चे कर्त्यांना पांगवीन्याचा प्रयत्न केला,मोर्चाचे नेतृत्व विराआंस अध्यक्ष अॅड.वामनराव चटप,मुख्य संयोजक रामजी नेवले,महीला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे यांनी केले होते, 

 तर या आंदोलनात ५००० पेक्षा अधीक विजग्राहक,शेतकरी,महीला,तरून,बेरोजगर सहभागी झाले‌ होते.वेगळा विदर्भ झालाच पाहीजे,विज बील माफी झाली पाहीचे,२०० युनिट मोफत विज मीळालीच पाहीजे,महाराष्ट्र सरकार के अत्याचाल से आझादी,कीसान आत्महत्यासे आझादी,बेरोजगारी से आझादी,आझाद‌ देशमें आझादी, आझाद वाली आझदी,आंबेडकर वाली आझादी,वो गांधी वाली आझादी,तो भगत सींग वाली आझादी,ईंकलाब जिंदाबाद,जय विदर्भ, आझादी  आझादी च्या घोषना देत संपुर्ण परीसर दनाणुंन सोडले होते.


ऊर्जा मंत्री डाॅ.नितीन राऊत घरी न थांबल्याचे कळल्या वर सर्व विदर्भवादी चिडले होते,त्या मुळे विदर्भवाद्यांनी पोलीसांचे कठडे ओलांडण्याचा प्रयत्ण केला त्या मुळे पोलीस व‌ विदर्भवाद्यांन मध्ये प्रचंड धक्का बुक्की झाली त्यात काही विदर्भवादी जखमी सुद्धा  झाले, या दरम्यान आंदोलन‌ आनखी चिघळण्या अगोदर नागपुर पोलीसांनी बल्लारशाह विराआंस तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार व शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांना अटक करून व्हान मध्ये कोंबले व नंतर विदर्भवाद्यांचा आक्रोष पाहता पोलीसांनी महीलांना आणी सर्व विदर्भवाद्यांना पोलीस व्हान मध्ये कोंबले. पोलीसांनी दडपशाही केली आहे, त्याचा आम्ही नीषेध करतो अस आंदोलनकर्त्यांनी आपल्या निवेदणात म्हनटले‌ आहे, तर आंदोलनात झालेल्या धक्का बुक्की प्रकरणी पोलीसंनी अंदाजे ३०० ते ३५० विदर्भवाद्यांना अटक करून पोलीस लाईन टाकडी येथील पोलीस मुख्यालयात नेले व सायंकाळी ७:३० ला सोडुन दीले तर या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समीती च्या बल्लारशाह तालुका व शहराच्या शाखेने उत्तम प्रतीसाद दर्षवीला या वेळी बल्लारशाह तालुक्यातुन तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत, तालुका सचिव गौतम कांबळे,शहर सचिव संदिप केशकर, शहर संघटक अविनाश गायकवाड, विभाग अध्यक्ष राकेश बहुरीया,विभाग कोषाध्यक्ष प्रतिक माटे, निखील बहुरीया,साहिल बनोदिया,यश शेंडे,सागर‌ ईरगुलवार सह असंख्य विदर्भवाद्यांनी सहभाग घेतला.

Previous Post Next Post