Top News

3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान स्त्री सक्षमीकरण महोत्सव जाहीर करून सरकारने साजरा करावा -डॉ. ऍड. अंजली साळवे (पाटीवाली ताई)

 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान स्त्री सक्षमीकरण महोत्सव जाहीर करून सरकारने साजरा करावा -डॉ. ऍड. अंजली साळवे (पाटीवाली ताई)


संविधान, महिला व बाल कायदे तसेच सरकारी योजनांबाबत जागृती करावी.



(विदर्भ माझा न्युज 24 उपसंपादक )गौतम कांबळे,राजधानी नागपूर :- सावित्रीच्या लेकींनी सामाजिक मनुवादाला बळी न पडता सावित्रीमाईंचा वारसा सक्षमपणे पुढे न्यावा सोबतच महाराष्ट्र शासनाने दरवर्षी 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान स्त्री सक्षमीकरण मोहोत्सव जाहीर करुन त्याव्दारे संविधान, महिला व बाल कायदे तसेच सरकारी योजनांबाबत जागृती करण्याचे आवाहन डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी केले.



महाज्योती या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व सत्कार कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाज्योती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप डांगे यांनी सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून केले व महाज्योतीचे उद्दिष्ट्य विषद केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रंजना सुरजूसे, छायाताई कुरुटकर, नीता ईटनकर यांना सन्मानित करण्यात आले. महाज्योती संस्थेने त्यांच्या इतर उद्दिष्टांसोबतच महिला व बाल कायदे, संविधान व मागासवर्गीयांसाठीच्या सरकारी योजना याबाबत जागृती उद्दिष्ट्ये म्हणून अंतर्भाव करण्याची मागणीही डॉ ऍड अंजली साळवे विटणकर यांनी महाज्योतीच्या संचालक मंडळाला केली.

या कार्यक्रमात कार्यकारी अधिकारी अतुल वासनिक, ऍड रेखा बाराहाते, वंदना वनकर, डॉ बबनराव तायवाडे, अतुल लोंढे यांनीही मार्गदर्शन केले. .स्टुडंट्स राईट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कोराम यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post Next Post