सवित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिर
ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर च्या वतीने सावित्रीबाई ज्योतीराव फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
(विदर्भ माझा न्यूज़ 24 - उपसंपादक)गौतम कांबळे, बल्लारशाह,चांदा(चंद्रपुर) :- ओबीसी समन्वय समिती,बल्लारपूर च्या वतीने सावित्रीबाई ज्योतीराव फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संत शिरोमणी जगनाडे सभागृह,बल्लारपूर येथे आयोजित केले होते.सदर शिबिराच्या कार्यक्रमाची सुरवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्याप्रण करून त्यांना अभिवादन केले.तसेच चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालय ची ब्लडबँक च्या टीमचे सदस्य सौ. वर्षा सोनटक्के, कृतिका गार्गीलवार, श्री. रूपक कामळी,श्री. दिनेश बागड यांचे स्वागत श्री. अनिल वागदरकर सर,श्री. विवेक खुंटेमाटे,सौ. इंदूताई राजूरकर,सौ. अर्चना फरकाडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी श्री. सतीश बावणे सर यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की फुले दाम्पत्य यांनी समाजा साठी आपल्या जीवाचं रान केलं.प्रथम सावित्रीबाई यांना ज्योतिरावाणी शिक्षित केलं आणि सावित्रीबाई च्या माध्यमातून स्त्री शिक्षण घडून आणलं.ओबीसी समन्वय समिती,अश्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ओबीसी ची जनजागृती करू व ओबीसी ची जनगणना पण घडवून आणू असे वक्तव्य वेक्त केले.या कार्यक्रमाचे संचालन श्री. किशोर मोहूर्ले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अमोल काकडे यांनी केले.या वेळी जवळ पास ५० रक्तदात्यांनी रक्त दान केले.त्यात अंकित निवलकर, सुनील भटारकर,अमित मांडवकर, संतोष गौरकर,,संदीप खांडेकर,कुणाल कौरसे,चंदू वाढई आदी रक्तदात्यांनी रक्त दान केले. हे शिबीर पार पडण्यास श्री. अशोक झोडे, श्री. प्रभाकर कवलकर,श्री. महाकाळकर सर, श्री. मनोहर माडेकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

