जर नाव बदलल्याने कर्म बदलत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सुद्धा आपल नाव बदलवून योगी आदित्यनाथ करून घ्यावा - वृषभ वानखेडे (नागपुर जिल्हा अध्यक्ष विरांआस युवा आघाडी)
(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक) संजय घुगलोत,काटोल :- विदर्भ राज्य आंदोलन समीती युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष वृषभ वानखेडे यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना महावीकास आघाडी सरकार वर चांगलाच हल्ला चढवीला.
विद्ये चे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातुन प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकांसह अनेक पुस्तके प्रकाशित होत असतात, परंतु कुठं ना कुठं विदर्भ चा इतिहास लपवीला जातो व पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास आमच्या विदर्भातील जनतेवर विद्यार्थांनवर लादला जातो.
भक्त बुलंदशहा या गोंड राजांनी नागपूर शहराची स्थापना केली या नंतर नागपूरच्या गोंड राजाचे शासन काळात, सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने हा तलाव बांधला. पूर्वी या तलावाचे नाव सीतागोंडीन तलाव असे होते, हा तलाव नागपुर शहरानजीक गोरेवाडा गावाजवळ असल्याने व याच तलावाजवळ गोरेवाडा प्राणीसंग्रहालय असल्याने या प्राणीसंग्रहालयाला गोंड राजाचं नाव देणं संयुक्तिक आहे.
कारण हा इतिहास गोंडवाना विदर्भ राज्याचा आहे महाराष्ट्राचा नाही, तर मंग महाराष्ट्रवासी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच नाव देऊन विदर्भाचा इतिहास पुसण्याचं काम विदर्भद्रोही महाराष्ट्र सरकार करत आहे. जर नाव बदलल्याने कर्म बदलत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी सुद्धा आपला नाव बदलवून योगी आदित्यनाथ करून घ्यावा.
ज्या प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी नामांतराचा एक ट्रेंड शुरु केला होता त्यास प्रकारे उध्दव ठाकरे यांनी सुद्धा प्रथम समृद्धी महामार्गाचा नाव बदलवून बाळासाहेब ठाकरे महामार्ग केला व आता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रणि संग्रहालयाचे नामकरण करुन बाळासाहेब ठाकरे प्राणि संग्रहालय असे नाव देने म्हणजे विदर्भातील इतिहासाला पुसन्याच काम आहे.असे मत विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी नागपुर जिल्हा अध्यक्ष वृशभ वानखेडे यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना व्यक्त केले.
