विदर्भ राज्य आंदोलन समिती चे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.
विदर्भाच्या लढाईसाठी हजारो वक्ते होणार तयार- विदर्भ राज्य आंदोलन समिती.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,राजधानी नागपुर :- विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ५० कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन आज दि.३० जानेवारी २०२१ दु.१२:००वा. आमदार निवास, नागपुर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती चे नेते ऍड.वामनरावजी चटप यांच्या हस्ते तर मुख्य संयोजक राम नेवलेजी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डेजी, प्रा. पुरूषोत्तम पाटील, मुकेश मासुरकर, सुनिल वडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. नागपुर, वर्धा, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांचे कार्यकर्ते शिबीर ५० कार्यकर्त्यांनी आज शिबीरात सहभाग घेतला.
उद्घाटन करताना ऍड.वामनरावजी चटप यांनी सांगितले की, विदर्भाच्या लढाईत वक्ते व सेनापती मोठ्या प्रमाणात तयार झाले पाहिजे तरच हि लढाई आम्ही लवकर जिंकु म्हणून है प्रशिक्षण शिबीर असून प्रत्येक जिल्ह्यात असे शिबीर होणार आहे. राम नेवलेजी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले असता या ५० वक्तयांनी गाव तालुके पिंजुन विदर्भाचा आवाज बुलंद करायचा आहे. उद्घाटना नंतर लगेच १२:३० ते २:००वा पर्यंत विदर्भाचा ऐतिहासिक वारसा, काॅंग्रेस - भाजप कडून झालेली विदर्भाची फसवणूक या बाबत मार्गदर्शन समितीच्या विदर्भ प्रदेश महिला आघाडी रंजना मामर्डे यांनी केले.
विदर्भाचा वैभवशाली इतिहास, महाभारत - रामायण काळात विदर्भाचा उल्लेख होता येथून तर स्वातंत्राच्या अगोदर ५ काॅंग्रेस अधिवेशनात काॅंग्रेस ने विदर्भाचा ठराव केले. स्वातंत्र्या नंतर काॅंग्रेस ने विदर्भा करीता अनेक आयोग स्थापन केले, त्यांनी विदर्भ अलग व्हावा यासाठी अहवाल दिला. काॅंग्रेस ची सत्ता असताना ही त्यांनी विदर्भ दिला नाही! व विदर्भाच्या जनतेला फसवीले, तसेच भाजप ने सुद्धा ठराव दिला , अनेक आंदाेलन सुद्धा केले आश्र्वासन देऊन ही त्यांनी विदर्भ दिला नाही. त्यांनी ही विदर्भाच्या जनतेला फसवीले त्यांचे इंतभुत पुरावे व महिती या पहिल्या सत्रात रंजना मामर्डे यांनी दिले.
या सत्रात वृषभ वानखेडे, गुलाबराव धांडे, रेखा निमजे, बाबाराव वाघमारे, नरेश निमजे, सुमिता येरने, विना भोयर, शोभा येवले, सुरज पात्रे, उल्हास कोटमकर, सचिन डांगे, मनिषा फुंडे, राजेंद्र सतई, प्रशांत तागडे, विष्णू आष्टीकर, अरून केदार, सुदाम राठोड सह ५० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

