बल्लारशाह शहरात नगराध्यक्ष चषक टुर्नामेंट मध्ये पत्रकार टीमची विजय सलामी.
पत्रकार टीम कडून युवा पत्रकार रोहित लोणारे आणि मंगेश बेले या सलामी जोडीने धुवा धार सुरवात करीत मीळवीला विजय.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह, जि.चांदा :- आज पासून बल्लारशाह मध्ये सुरू झालेल्या नगराध्यक्ष चषक क्रिकेट टुर्नामेंट मध्ये पहिला सामना नगर सेवक टीम विरुद्ध पत्रकार टीम चा सामना झाला, यात पत्रकार टीमचा सलामी विजयाने या टुर्नामेंट ची सूर्वात झाली.
पत्रकार टीम नी टॉस जिंकून नगर सेवक टीम ला बॅटिंग करायला आमंत्रित केले तर नगर सेवक टीम कडुन हरीश शर्मा आणि राकेश यादव यांनी ओपनिंग करत पत्रकार टीम ला 79 रण चे लक्ष दिले . तर पत्रकार टीम कडून युवा पत्रकार रोहित लोणारे आणि मंगेश बेले या सलामी जोडीने धुवा धार सुर्वात करत 7 व्या ओवर मध्येच सलामी विजय मिळवीला.

