Top News

ओबीसी बांधवांचा अनोखा उपक्रम संक्रांती सणाला पंतगीवर पाटी लावून जनजागृती.

 ओबीसी बांधवांचा अनोखा उपक्रम संक्रांती सणाला पंतगीवर पाटी लावून जनजागृती.


ओबीसी कॉलम नसेल तर जनगणनेला स्थगीती दया.



(विदर्भ माझा न्यूज 24 उपसंपादक गोतम कांमळे) बल्लारशाह :-     केंद्र सरकारने जनगणना 2021चा कार्यक्रम जाहीर केला याबाबत नमुना चाचणी आगस्ट 2019  ला  करण्यात आली होती, त्या नमुना प्रश्नावलीत ओबीसीच्या गणाने बाबत उल्लेख नव्हता.स्वतंत्रतपूर्व काळात 1931 ला  ओबीसीची संख्या 52% टक्के होती . ओबीसी संख्या  देशात सर्वात जास्त  असुनसुद्धा स्वातंत्र्या नंतर ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्यात आले म्हणून ओबीसी समुदायात भारी असंतोष आहे.ओबीसी ची गणना व्हावी म्हणून " जनगणना 2021 मध्ये  ओबीसीचा कॉलम नाही म्हणून आमचा सहभाग नाही " ही डॉ ऍड अंजली साळवे यांनी सुरू केलेली पाटी लावा जनजागृती मोहीम  ओबीसी समन्वय समीती , बल्लारपुर गेल्यां दिड वर्षा पासुन घरावर पाटी लावुन,आटोवर ब्यानर लावून,रक्त दान शिबिरा व्दारे तसेच  संक्रातीला पाटी चे वाण देऊन  ही मोहीम ओबीसी जनगणेबाबत जागृती साठी राबविण्यात आली आहे .

या प्रत्येक उपक्रमात  संभाजी ब्रिगेड ,भुमीपुत्र युवा बहुदेशीय संस्था,नॅशनल ओबीसी फेडरेशन,जिजाऊ ब्रिगेड, ओबीसी महासंघ,स्वयम प्रेरित संघटना, हज़रत बहुदेशीय संस्था,अमन पसंद कमेटी, उलगुलान संघटना,आम आदमी पार्टी सारख्या अनेक संघटना ओबीसी जनगणनेबाबत जागृती मोहिमेत सहभागी आहेत . अंजलीताईच्या ओबीसी का ऐलांन पाटी लगाओ अभियान या आवाहनाला महाराष्ट्रात  विविध ठिकाणी प्रतिसाद देत  पाट्या लावा मोहिमे अंतर्गत  अनेक उपक्रम  महाराष्ट्रात विविध संघटना मार्फत विविध रुपात राबविल्या जात आहे. 

  या वर्षी ओबीसी समन्वय समिती बल्लारपूर व ओबीसी बांधावा मार्फत संक्राती सणा निमीत्याने  "जनगणना 2021 मध्ये OBC(VJ/DNT/NT/SBC) चा कॉलम नाही,म्हणुन  जनगणनेत आमचा सहभाग नाही "असा संदेश पतंगीवर लिहून आकाशात पतंग उडवत ओबीसी प्रवर्गा मार्फत सरकारला ओबीसी गणनेची मागणी व जनजागृती साठी हा उपक्रम  संक्रांतीच्या दिवशी राबविण्यात आला.

 ओबीसी जनगणनेचे  गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तत्काळ ओबीसी जनगणेचा कॉलम समाविष्ट करावा यासाठी मोर्चा, आंदोलना सोबतच पाटी लावा अभियानामार्फत  ओबीसी  

जनगणना जागृती साठी संक्रांतीला पाटी चा संदेश   पतंगी वर लिहून ती आकाशात उडविल्या गेली . या उपक्रमा अंतर्गत बऱ्याच ओबीसींनी  जागृती मोहिमेत सहभाग घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जागृती करण्यासाठी ओबीसी समन्वय समितिचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे यांनी पुढाकार घेतला व त्यांचे सोबत श्री माडेकर सर, किशोरी मोहुर्ले, चन्द्रशेखर भेडारकर,सुनील भाऊ भटारकर,शंकर काळे,ईदुताई राजुरकर,मानुसमारे ताई,सतीश बावणे सर,अकित नीवलकर, गजानन व्यवहारे,भास्कर भाऊ फरकाडे, केशव थीपे,अमोल काकडे


Previous Post Next Post