नागभीड येथे ३ डिसेंबरला आंदोलन; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
नागभीड : आज दि. ३ डिसेंबर २०२६ रोजी नागभीड शहरात प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागभीड शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले असून नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आंदोलनाच्या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
1. नागपुर, भंडारा कडुन नागभिड मार्गे वडसा, गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी निलजफाटा-पवणी-लाखांदूर-वडसा या मार्गचा वापर करावा.
2. वरोरा, भिसी, चिमुर कडुन नागभिड मार्गे वडसा गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी शंकरपुर-नेरी-सिदेवाही-मुल-सावली या मार्गचा वापर करावा.
3. चंद्रपूर, मुल, सावली कडुन नागभिड मार्गे वडसा, गडचिरोली कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी मुल-सावली या मार्गचा वापर करावा.
4. चंद्रपूर, मुल, सिंदेवाही कडुन नागभिड मार्गे नागपुर कडे जाणाऱ्या सर्व नागरिकांनी सिंदेवाही-नेरी-शंकरपूर-काम्पा-टेम्पा या मार्गचा वापर करावा.
आंदोलनाच्या कालावधीत सर्व वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.
