Top News

पद्मशाली समाजातर्फे मार्कंडेय जयंती महोत्सव

पद्मशाली समाजातर्फे मार्कंडेय जयंती महोत्सव

महोत्सवात डॉ. बंडू आकनुरवार, राम मल्लेलवार, अजय शिप्पावार यांचा सत्कार



भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार -  वरोरा तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय मार्कंडेय ऋषी यांचा जन्मोत्सव स्थानिक भडगरे यांच्या शिवमंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक यशवंतराव आगबत्तनवार होते. प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पद्मशाली महासभेचे सदस्य शंकर दिगदेवतुलवार, आनंदराव बोडूवार, राजाराम चिल्कावार, पुरुषोत्तम येनगंदलवार, योगेश बेतवार, संदीप येनगंदेवार, प्रकाश कामनवार, जिल्हा पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बंडू आकनुरवार, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राम मल्लेलवार, सिव्हिल अभियंता अजय शिप्पावार यांचा समावेश होता. 


प्रारंभी हवनसह मार्कंडेय ऋषींच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पद्मशाली समाजातील मान्यवरांचा त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. बंडू आकनुरवार यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याबद्दल, तसेच राम मल्लेलवार व अजय शिप्पावार यांच्या कार्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. बंडू आकनुरवार यांनी समाज संघटन, जनजागृती व समाज एकजुटीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.

सत्कार समारंभाचे प्रास्ताविक व संचालन शंकर दिगदेवतुलवार यांनी केले, तर आभार सोनल येनगंदलवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदराव बोडूवार, राजाराम चिल्कावार, शंकर दिगदेवतुलवार, पुरुषोत्तम येनगंदलवार, सुरेश आगबत्तनवार, संदीप येनगंदेवार, योगेश बेतवार, सपना येनगंदेवार, पूजा येनगंदलवार यांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादाने मार्कंडेय जयंती महोत्सवाची सांगता झाली.

Previous Post Next Post