Top News

अपघाताने मरण्यापेक्षा आमरण उपोषणाने आलेला मृत्यू मान्य.... _मुनेश्वर बदखल_

 अपघाताने मरण्यापेक्षा आमरण उपोषणाने आलेला मृत्यू मान्य.... _मुनेश्वर बदखल_ 


लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा एल्गार 




भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार :  नरकाची वाट कशी बिकट असते हे पाहायचे असल्यास सुमठाना ते ढोरवासा पुढे तेलवासा पिपरी रस्ता बघावा अगदी मोफत पने हि सेवा प्रशासन, व लोकप्रतिनिधींनी , मध्य रेल्वेच्या गलथान प्रशासनाने , रेती तस्करांनी उपलब्ध करून दिलेली आहे.

विडंबनात्मक असले तरी कित्येक वर्षापासून आयुध निर्माणि च्या अखत्यारीत मार्गाची धूळधाण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यात दोषी कोण? हा ही संशोधनाचा विषय ठरला आहे. आयुध निर्माणि, की बांधकाम विभाग याचा अजूनही सोक्षमोक्ष न झाल्याने रस्ता दुरुस्तीची निव्वळ टोलवाटोलवी चाललेली आहे.

भद्रावती तालुक्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने पंचक्रोशीतील शेतकरी, विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आदींना दिवस रात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तेलवासा, ढो रवासा पिपरी, चिरादेवी , घोनाड, कोच्ची वरून निघालेला नागरिक सुखरूप घरी येईलच याचा काही नेम नाही

तहसील प्रशासन , पोलिस प्रशासनास नदीपात्रातून दिवस रात्र रेती उपसा करून अधिक क्षमतेची वाहने चालतात हे माहिती नसेल तर हे जगातलं आठव आश्चर्य समजावे.

या परिसरातील ग्रामपंचायत सदस्य,सरपंच , सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन, तक्रारी चा रतीब पाडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा कित्येकदा प्रयत्न केला खरा मात्र आजपावेतो प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली नाही हि बाब वास्तविक आहे.

अंतिमतः ढोरवासा येथील मुनेश्वर बदखल युवा सेना वरोरा भद्रावती (शिंदे सेना) यांनी स्थानिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृह प्रवेशद्वाराजवळ दिनांक.१६ जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणास सुरवात केलेली आहे. यात विविध संघटना, सामाजिक प्रतिनिधी , परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले असून आता तरी प्रशासनास जाग येईल का? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस असून अजूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

Previous Post Next Post