Top News

Breaking News : बिबट्याच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू.....संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची कारवाई (Leopard attack claims labourer’s life)

Breaking News  : बिबट्याच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू.....संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली तातडीची कारवाई






चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील (Moharli Forest Range) पद्मापूर बिटात (Padmapur Beat) बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सदर घटना मंगळवार, दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी घडली.

साहजू चमरू बिलठेरिया (Sahju Chamru Biltheria), वय अंदाजे 63 वर्षे (age approx. 63 years), रा. प्रतला, ता. मंडला, मध्यप्रदेश (resident of Pratla, Mandla district, Madhya Pradesh) हे अडेगाव गावालगत (near Adegav village) कक्ष क्रमांक 181 (Compartment No. 181) मध्ये बांबू कटाईचे काम (bamboo cutting work) करीत असताना सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास (around 8.30 am) बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.


घटनेची माहिती मिळताच संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली (Range Forest Officer, Moharli – Territorial) यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने तातडीची कारवाई सुरू केली. यासोबतच संदीप एकाडे, पोलीस निरीक्षक, दुर्गापूर पोलीस स्टेशन (Police Inspector, Durgapur Police Station) व त्यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली. वनपाल व क्षेत्रीय वनरक्षकांच्या उपस्थितीत पोलीस पंचनामा व मौका पंचनामा (spot panchnama) करण्यात आला.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी (post-mortem) जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर (District Hospital, Chandrapur) येथे पाठविण्यात आला. मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ मदत म्हणून (immediate relief) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाकडून रुपये 50,000/- (Rs. 50,000) ची आर्थिक मदत देण्यात आली.

दरम्यान, सदर परिसरात (in the said area) बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संतोष थिपे यांच्या सूचनेनुसार कॅमेरा ट्रॅप (camera traps) लावण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास (further investigation) त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण (panic situation) निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.


Previous Post Next Post