Top News

भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाचा न्यायमोर्चा उद्या नागपूरकडे रवाना....

 भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाचा न्यायमोर्चा उद्या नागपूरकडे रवाना....

अधिवेशनात सुशिक्षित बेरोजगारांच्या हक्कांसाठी महत्त्वाच्या मागण्या मांडणार...




भंडारा : भंडारा जिल्हा सुशिक्षित बेरोजगार सेवा संघाच्या वतीने उद्या सकाळी ९ वाजता त्रिमूर्ती चौक, कलेक्टर ऑफिसजवळून भव्य न्यायमोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कांसाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संघाच्या माहितीनुसार, शासनाच्या विविध योजनांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना योग्य प्राधान्य मिळावे, रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, स्थानिक सेवा संस्थांना चालना द्यावी तसेच बेरोजगारांच्या समस्यांवर ठोस धोरण राबवावे, यांसारख्या मूलभूत व तातडीच्या मागण्या अधिवेशनात प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.

मोर्च्याचे नेतृत्व संघाचे अध्यक्ष  संजय मते करणार असून, जिल्ह्यातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, युवक-युवती, आणि मोठ्या संख्येने सदस्य हजर राहणार आहेत.

संघाने सर्व सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन केले आहे की, आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी हा न्यायमोर्चा निर्णायक ठरेल, त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवाज बुलंद करावा. उद्याच्या या मोर्च्याकडे जिल्ह्यातील नागरीकांचे विशेष लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post