STEM Podar Learn School, ब्रम्हपुरी (CBSE) च्या विद्यार्थ्यांचा विसापूर येथील श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनला शैक्षणिक सहल
विज्ञान, निसर्ग आणि ज्ञानाचा अद्भुत मिलाफ अनुभवत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत!
ब्रम्हपुरी : यांच्या वतीने इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विसापूर, बल्लारपूर जी. चंद्रपूर येथील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन येथे एकदिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्ग, विज्ञान आणि जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव देत “Learning Beyond Classrooms” हा उपक्रम साकार करणे हा होता.
या सहलीत एकूण ७२ विद्यार्थी व ७ मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले होते. सकाळी उत्साहाने प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विसापूरच्या सुंदर परिसरात असलेल्या बॉटनिकल गार्डनमधील विविध विभागांचा अनुभव घेतला.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी Underground Museum मध्ये विज्ञानाच्या नव्या संकल्पना जाणून घेतल्या. त्यानंतर Aquarium, Science Center, Biodiversity Zone, Dino Park, Math Garden तसेच रंगीबेरंगी Butterfly Park या विभागांना भेट दिली. विशेष म्हणजे Science Center इतके आकर्षक वाटले की विद्यार्थ्यांनी ते दोन वेळा पाहण्याचा आनंद घेतला!
दिवसाचा शेवट सचिन उमरे (मॅनेजर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित इंटरॅक्टिव क्विझ सेशन ने झाला, ज्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला उत्तेजन मिळाले तसेच वैज्ञानिक विचारांना चालना मिळाली.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच निसर्ग, विज्ञान आणि गणितातील प्रत्यक्ष ज्ञानाचा अमूल्य अनुभव घेता आला. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवर्गांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा सहलीतून सतत शिकण्यास प्रोत्साहन दिले.
“शिकताना आनंद, आणि निसर्गातून ज्ञान” — या घोषवाक्याने ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या मनात अविस्मरणीय ठरली. 🌱✨
#STEMPodar #PodarLearnSchool #Bramhapuri #EducationalTour #BotanicalGarden #Visapur #Chandrapur #ScienceAndNature #CBSESchool #StudentExploration #FutureScientists


