योगेश मुऱ्हेकर दैनिक नवराष्ट्र निर्माण वृतपत्राच्या चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी पदावर
भारत सरकारच्या सूचना व प्रसार मंत्राल्यातील प्रेस रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणीकृत, महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमध्ये दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्र नियमित प्रकाशित करुन भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशित करण्याचे ध्येय बाळगुण असलेले दैनिक नवराष्ट्र निर्माणचे संपादक दबिरुद्दिन एस. ख्वाजा व चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी श्री संतोष जी पारखी, यांनी चंद्रपुर जिल्ह्याची महत्व पूर्ण जिम्मेदारी माहिती अधिकारी व पत्रकार स्वरक्षण समिती मरा. चे माजी विदर्भ विभागीय अध्यक्ष तसेच युवाशक्ती ग्रामविकास संघटन चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा स्वतंत्र विदर्भ चळवळीतील माजी चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जनशक्ती न्यूज चे माजी जिल्ह्याप्रतिनिधी योगेश भाऊ मुऱ्हेकर यांचे सामाजिक कार्य, पत्रकारिता विषयी आपली आवड व उत्सुकता पाहता भारतातील नामांकीत व पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक नवराष्ट्र निर्माण वृत्तपत्राच्या चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली.
सर्वत्र अभिनंदन
तसेच योगेश मुऱ्हेकर हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहत असून वाचन व लिखाण कलेत महारात आहे, योगेश मुऱ्हेकर दैनिक नवराष्ट्र वृतपत्राच्या चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी पदाची जबाबदारी संविधान, कायदे समाज, पत्रकारिता तसेच दैनिक नवराष्ट्र निर्माण च्या नियमांशी प्रामाणिक राहून आपली जिम्मेदारी पार पाडतील, यात शंका नाही. त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांना अभिनंदन करण्यात आले.
