Top News

कष्टाची भाकर : रंगमंचावर साकार होणार नाटकातून श्रम व संस्कृतीचा संगम.

कष्टाची भाकर : रंगमंचावर साकार होणार नाटकातून श्रम व संस्कृतीचा संगम. 




चंद्रपूर / राजुरा : मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी : गावकरी नाट्यकला मंडळ, कळमना (वाढई) आणि वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने " संगीत कष्टाची भाकर " हे सामाजिक आशयावर आधारित प्रभावी नाटक प्रेक्षकांसाठी मोफत सादर केले जाणार आहे. हा नाट्योत्सव दिनांक ४ नोव्हेंबर २०२५, मंगळवार रात्रौ १०.०० वाजता, आदर्श जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत कळमना (वाढई ) च्या भव्य पटांगणावर रंगणार आहे. 

         कष्टाची भाकर या संकल्पनेवर आधारित या नाट्यप्रयोगात बळीराजाचे जीवन दर्शन, ग्रामीण जीवनातील संघर्ष, आत्मसन्मान आणि सामाजिक एकतेचा संदेश कलात्मक पद्धतीने मांडला जाणार आहे. नाटकानंतर रेकार्डींग डान्सची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे.

        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकवर्गणीतून आयोजित या नाट्यप्रयोगात कळमनाचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश वाढई, प्रभाकर साळवे, मंगेश ताजणे, कवडू गौरकार, प्रशांत ताजणे, श्रीकांत कुकडे, प्रविण चिंचोलकर हे कलावंत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. बालकलावंत यश ताजणे आणि स्त्री कलावंत मिस. लता, मिस. उषा, मिस. सुप्रिया यांचा सहभाग कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

       या नाटकाचे लेखक संजय बोरकर, दिग्दर्शक नंदकिशोर वाढई, तर निर्माता बाळकृष्ण पिंगे आहेत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महादेव ताजणे व देवानंद आंविलकर करणार असून जय रंगदेवता प्रसन्न या उद्गारांसह कळमना येथे सांस्कृतिकतेचा उत्सव रंगणार आहे.

Previous Post Next Post