अडेगावची वाघीण जनतेच्या मनात ! पंचायत समिती सभापतीपदासाठी सौ. सीमा लालसरे यांची प्रभावी दावेदारी
अडेगाव (ता. झारी-जामनी) : झारी-जामनी पंचायत समिती सभापती पदाच्या दावेदारीच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सौ. सीमा लालसरे यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या मनात ठसा उमटवला आहे.
अडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर असताना त्यांनी गावात पिण्याच्या पाण्याची योजना, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, महिला बचतगटांचे बळकटीकरण, मंदिर आणि शाळा विकास, तसेच युवकांसाठी रोजगारविषयक उपक्रम राबवले. या सर्व कामांमुळे त्या जनतेच्या मनात “अडेगावची वाघीण” म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
सध्या त्या पंचायत समितीच्या मैदानात सुरू असलेल्या सभांमधून थेट जनतेशी संवाद साधत आहेत. गावोगाव फिरून विकासासाठी आपले कार्य आणि नियोजन मांडत आहेत. लोकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या ऐकण्याची आणि त्यावर तत्काळ उपाययोजना सुचवण्याची त्यांची कार्यशैली चर्चेचा विषय ठरत आहे.
जनतेतून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद आणि महिलावर्गाचा वाढता पाठिंबा पाहता, सौ. सीमा लालसरे यांची सभापतीपदासाठीची दावेदारी अधिकाधिक मजबूत होताना दिसत आहे.
त्या अपक्ष उभा राहील की कोणत्या पक्षाचं त्यांना तिकीट मिळेल हे वेळच सांगेल पण सामान्य जनता मात्र त्याच्या पाठीमागे भक्कम उभ्या आहेत.
