Top News

मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्काळ उपाययोजना: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश...

मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्काळ उपाययोजना: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या पाठपुराव्याला यश...


रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी महेश श्रीगिरीवार यांचा ठोस पाठपुरावा...




पोंभुर्णा – प्रतिनिधी  :: पोंभुर्णा येथून चंद्रपूर-मूल मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचे मोठे हाल सुरू होते. सदर खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असून, विद्यार्थी व नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून थेट उपविभागीय अभियंत्यांशी फोनद्वारे संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तात्काळ प्रतिसाद देत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्ता व्यवस्थित डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

या कृतीमुळे परिसरातील विद्यार्थी, नागरिक आणि वाहनधारकांनी मोठा दिलासा अनुभवला असून, शिवसेना युवा सेनेच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच भविष्यातही जनतेच्या अडचणीसाठी सतत तत्पर राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या वेळी साहिल नैताम, प्रवीण सातपुते, सूरज कावळे, मुकेश ठाकरे, रुणाल गुरुनुले यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post