An 11-foot python faced a life-threatening situation in the dark of night… Snake lovers gave it a new lease of life!

रात्रीच्या अंधारात ११ फूट अजगराची जीवघेणी अडचण… सर्पमित्रांनी दिला नवजीव!


डम्पिंग यार्ड अष्टभुजा येथे जाळीत अडकलेल्या अजगरास सुखरूप रेस्क्यू; हॅबिटेट कॉन्सर्वेशन सोसायटीच्या पथकाचे मोलाचे योगदान




 चंद्रपूर : डम्पिंग यार्ड, अष्टभुजा येथे ११ फूट लांबीचा अजगर साप तारांच्या जाळीत अडकलेला आढळून आला. ही घटना रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली असून, कामगारांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्रांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे सापाचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच हॅबिटेट कॉन्सर्वेशन सोसायटी चे सदस्य साईनाथ चौधरी यांनी आपल्या पथकातील सदस्य विशाल मडावी, रणजीत मडावी व अनिकेत वनकर यांच्यासह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पाहणी केली असता साप हा अंदाजे ११ फूट लांबीचा अजगर जातीचा असल्याचे स्पष्ट झाले.

सर्पमित्रांनी शांतपणे आणि कौशल्याने तारांची जाळी कापून अजगरास कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या बाहेर काढले. यानंतर वनविभागाच्या मदतीने सापाची नोंद घेऊन त्यास लोहार जंगल परिसरात मुक्त करण्यात आले.

या शिताफीने पार पडलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, सर्पमित्रांच्या तात्काळ व दक्ष कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा दुर्मिळ वन्यजीवाच्या रक्षणात स्थानिक पातळीवरील संवेदनशीलता आणि सहकार्य हा महत्त्वाचा धडा असल्याचे पर्यावरणप्रेमींनी नमूद केले.