युवकांची बोगस कंपनीकडून फसवणूक; मनसे आक्रमक

युवकांची बोगस कंपनीकडून फसवणूक; मनसे आक्रमक 

 न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीv – अमन आंदेवार


https://youtu.be/IRagSTEt64E?si=1pIrpGqvCxPwbaAf 👈🏻 व्हिडिओ बातमी बघण्यासाठी येथे क्लीक करा....

चंद्रपूर (गौतम कांबळे | उपसंपादक +918605011881 ) पूरक प्रॉडक्ट विक्रीच्या नावाखाली युवक-युवतींकडून लाखोंची फसवणूक करणाऱ्या इंडस्ट्री वेंचर प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कंपनीविरोधात संतप्त युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आहे. बाबूपेठ (चंद्रपूर) येथे सदर कंपनीने प्रत्येकी ₹४६,५०० घेत नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मात्र तीन-चार महिन्यांपासून पगार तर दूरच, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पलायन केल्यामुळे पीडित तरुण व तरुणींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. आंदेवार यांनी तातडीने हस्तक्षेप करत कंपनीशी संपर्काचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्याच दिवशी कंपनीने कार्यालय बंद करून कामचुकार कर्मचाऱ्यांना पसार केले.

यानंतर आंदेवार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन जनतेला या फसवणुकीची माहिती देण्यात आली. बातमीने जिल्हा पार केला आणि वर्धा जिल्ह्यातही असेच प्रकार समोर आले. वर्ध्यातील इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही युवकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

https://youtu.be/IRagSTEt64E?si=1pIrpGqvCxPwbaAf 👈🏻 व्हिडिओ बातमी बघण्यासाठी येथे क्लीक करा....

वर्ध्याच्या मनसे जिल्हाध्यक्ष शंकर यांच्या सहकार्याने पीडित व पालकांसह मनसे शिष्टमंडळाने कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. मात्र कंपनीने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, वादावादीतून हाणामारी झाली आणि पोलिसांत तक्रार पोहचली. विशेष म्हणजे, वर्धा पोलिसांनी उलट मनसे कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल केले असल्याची माहिती आहे.

https://youtu.be/IRagSTEt64E?si=1pIrpGqvCxPwbaAf 👈🏻 व्हिडिओ बातमी बघण्यासाठी येथे क्लीक करा....

या प्रकरणावर बोलताना अमन आंदेवार म्हणाले, “आमचा उद्देश शांततेने चर्चा करून मार्ग काढण्याचा होता, मात्र परिस्थिती बिघडली याची आम्ही जबाबदारी घेतो. मात्र युवकांची फसवणूक होऊ देणार नाही.”

फसवणूक झालेल्यांमध्ये ग्रामीण व अल्पवयीन युवकांचा समावेश असल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, “बाहेरच्या राज्यातील बोगस कंपन्या महाराष्ट्रात येऊन फसवणूक करतील, हे आम्ही खपवून घेणार नाही. मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही!”

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – चंद्रपूर जिल्हा (कामगार सेना विभाग)

✍️ खास नोंद: युवकांनी अशा स्कीम्सपासून सावध राहावे, आणि नोकरीच्या आमिषाने कोणतेही आर्थिक व्यवहार करताना कंपनीची पार्श्वभूमी नीट तपासावी.

 https://youtu.be/IRagSTEt64E?si=1pIrpGqvCxPwbaAf 👈🏻 व्हिडिओ बातमी बघण्यासाठी येथे क्लीक करा....