Top News

राकेश सोमानी यांची "पुरोगामी पत्रकार संघाच्या" चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती....

राकेश सोमानी यांची "पुरोगामी पत्रकार संघाच्या" चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती....


विदर्भ माझा न्यूस 24 | बल्हारशाह :: महाराष्ट्र राज्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राकेश सोमानी यांची "पुरोगामी पत्रकार संघ भारत" या राष्ट्रीय संस्थेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक २४ जुलै २०२५ पासून पुढील एक वर्षांसाठी म्हणजेच २४ जुलै २०२६ पर्यंत वैध राहणार आहे.

"पुरोगामी पत्रकार संघ भारत" या संघटनेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेत सोमानी यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे पत्रकार संघटनेच्या कार्यात नवे योगदान लाभेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगडे, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, आणि राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांनी राकेश सोमानी यांचे अभिनंदन केले आहे.

संघटनेतर्फे त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post