संघटन हा भाजपचा आत्मा - हरीश शर्मा
नागभीड येथे भाजपा कार्यालयात 'संकल्प ते सिद्धी' कार्यशाळा संपन्न....
नागभीड :: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 11 वर्षाची यशस्वी सेवा पूर्ण केल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी चिमूर विधानसभेच्या वतीने नागभीड येथे भाजपा कार्यालयात आमदार बंटी भांगडिया यांच्या मार्गदर्शनात 'संकल्प ते सिद्धी' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा चंद्रपूर जिल्हा चे अध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा महामंत्री तथा जि.प. परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरुनुले, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ.श्याम हटवादे, प्रा. डॉ. अमीर धमाणी, माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे, चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजुकर, गजानन गूळधे, भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस प्रिया लांबट, तालुकाध्यक्ष इंदू आंबोरकर, भाजपा युवा नेते मनीष तुमपल्लीवार,हेमंत लांजेवार, सुधीर दोनाडकर यांची उपस्थिती होती.
यावेळी तिसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हरीश शर्मा यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. संजय गजपुरे यांनी कार्यशाळा आयोजना मागचा हेतू आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
चिमूर विधानसभा संघटन प्रमुख शक्ती केराम यांनी विधानसभेतील संघटनात्मक माहिती सादर केली. प्रास्तविकातून चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांनी गेल्या 11 वर्षात केंद्रातील मोदी सरकार हे सेवा, सुशासन, व गरीब कल्यानासाठी काम करणारे शासण म्हणून ओळखले जात असून शेवटचा घटक सुद्धा विकासाच्या प्रवाहात आल्याचे विचार व्यक्त केले.
तर मार्गदर्शन करताना भाजपा ज्येष्ठ नेत्या संध्या गुरुनुले यांनी पक्षाने दिलेला प्रत्येक कार्यक्रम हा आपण राबवीला पाहिजे तसेच सरकारच्या विविध योजना या लाभार्थी पर्यंत पोहचवल्या पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा यांनी संघटना हा भारतीय जनता पक्षाचा आत्मा असून येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी मध्ये यश संपादन करायचे असेल तर संघटन हे मजबूत करणे गरजेचे आहे.
या बरोबरच ज्या विभूतींनी या देशासाठी आपले बलिदान दिले त्या विविध महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास हा विविध उपक्रमाच्या माध्यमातून समोर आणला पाहिजे.1975 साली लादलेल्या आणीबानी ची खरी कारणे जनतेपुढे ठेवली पाहिजे. विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकता निर्माण करीत आपल्याला यश गाठायचे असल्याचे त्यांनी विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष संतोष रडके यांनी केले तर प्रास्ताविक गणेश तर्वेकर यांनी तर आभार जगदीश सडमाके यांनी मानले.