शिर्डीच्या राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळेत राहुल कळंबे यांचे सादरीकरण.....मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
नागभीड : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्च्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे एक दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अनुभवात्मक शिक्षण या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सिंगापूरचे सादरीकरण केले. मुळातच उपक्रमशील व लेखनाची आवड असणारे राहुल कळंबे यांनी सिंगापूर देशात मी अनुभवलेला सिंगापूर या शीर्षकाखाली सिंगापूर येथील शासन, शिक्षक, पालक, समुदाय आणि स्वतः विद्यार्थी शिक्षणा बाबतीत कशी सकारात्मक भूमिका बजावतात तसेच सिंगापूर हे देश व त्याची वैशिष्ट्ये हे विषद केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले.
प्रस्तुत कार्यशाळेत शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे सचालक सजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार, श्रीमती सरोज जगताप (सहसंचालक), ज्योती शिंदे (उपसंचालक) व राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूक्ष्म नियोजनाखाली सिंगापूर अभ्यास दौरांचा विस्तृत व परिपूर्ण अहवाल लेखन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने 22 मार्च ते 27 मार्च ला राज्यातील 48 उपक्रमशील शिक्षकांना विदेश दौरा सिंगापूर येथे नेऊन तेथील शिक्षण पद्धती अभ्यासण्यात आली.राज्याने प्रथमच हा विदेश दौरा आयोजित केल्याने शिक्षक देखील उत्साहित होते.प्रस्तुत
कार्यशाळेत सिंगापूर येथील शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, वर्ग संरचना, शिक्षक नेमणूक पद्धती, मूल्यमापन पद्धती, अध्ययन अध्यापन पद्धती, शिक्षक प्रशिक्षण, तिथे राबविण्यात येणारे विविध सहशालेय उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी बद्दल सादरीकरण करण्यात आले. सिंगापूर येथील शिक्षण पद्धती आणि महाराष्ट्र राज्य यांचा तुलनात्मक अभ्यास करून याबद्दल शिफारसी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागास सादर करण्यात आल्या.
शिक्षण मंत्री दादा भुसे यानी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध उपक्रम, योजना, शैक्षणिक कार्यक्रम याची माहिती देताना उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती असल्याचे मत व्यक्त केले. आपले महाराष्ट्र राज्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात देशातील एक अग्रेसर राज्य आहे.
लवकरच सिंगापूर अभ्यास दौऱ्याचा राज्यस्तरावर एक सविस्तर ड्राफ्ट तयार करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिगापूर अभ्यास दौऱ्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची राज्यात निश्चितच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले.
