Top News

विदर्भात शेतकरी आत्महत्येची मालिका सुरूच.....सरकारने गांभीर्याने लक्ष दण्याची ग्रामस्थांची मागणी.....

विदर्भात शेतकरी आत्महत्येची मालिका सुरूच.....सरकारने गांभीर्याने लक्ष दण्याची ग्रामस्थांची मागणी.....


गळफास घेऊन शेतकऱ्याने संपवली आपली जीवनयात्रा,  माळेगाव येथील खळबळ जनक घटना....




 आर्णी हिरासिंग राठोड (ता. प्र.) ::   तालुक्यातील माळेगांव येशील शेतकऱ्यांने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाच्या मानसिक तणावाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 3 में सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली, मृतक शेतकऱ्याचे नाव गुलाब उमला राठोड वय ५५ असून,शेतकऱ्याकडे चार एकर स्वतःच्या मालकीची शेती असून, शेतकऱ्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज आहे, सकाळी घरातील सर्व सदस्य शेतातील कामासाठी शेतात गेले असता,समोर पेरणीचे दिवस येत आहे, बियाण्यासाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांने या विचाराने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब राठोड हे अलिकडच्या काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्या शेतात पावसाअभावी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते अत्यंत चिंतेत असल्याने त्यांनी शेवटी आपल्या घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुल आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गुलाब गेले काही महिने मानसिक तणावात होते. सरकारकडून कर्जमाफीसंदर्भात काही ठोस निर्णय होत नसल्यामुळे त्यांचा संयम सुटला. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप बांरीगे घटनास्थळी दाखल झाले, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आले होते. सदर घटना 3 में 2025 रोज शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्येची मालिका अद्यापही थांबताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous Post Next Post