गरीब कुटुंबातील शिवानी रोगसिंग राठोड हिने मिळवले दहावी परीक्षेत 80.% गुण...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करत शिवर भंडारी गावाचे नाव केले उज्वल.....
आर्णी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जिद्द,मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही अडचण यशाच्या वाटेला अडथळा ठरू शकत नाही, याचे जिवंत उदाहरण शिवर भंडारी येथील कु. शिवानी रोखसिंग राठोड हिने घालून दिले आहे. विद्यार्थिनी 80% गुण मिळवून गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात,तर आई घरकाम करत संसाराला हातभार लावते. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही शिवानीने शिक्षणात सातत्य राखत आपली गुणवत्ता सिद्ध केली.अभ्यासासाठी ना भरपूर सुविधा होत्या, ना पोषक वातावरण; पण आत्मविश्वास,चिकाटी आणि जिद्द यांच्या बळावर तिने हे यश मिळवले.माझ्या यशामागे माझ्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि माझ्या आई-वडिलांचा त्याग आहे,असे भावनिक उद्गार शिवानीने यशानंतर व्यक्त केले.तिच्या यशामागील संघर्ष ऐकून गावकरी भारावून गेले असून, शिवानी भविष्यात अधिकारी होवो व गावाचा अभिमान ठरो,अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.शासनाने राबवलेल्या कापीमुक्त अभियानाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि आपल्या स्वबळावर यश मिळवण्याची जिद्द हे या यशकथेतून स्पष्ट होते. हे यश केवळ वैयक्तिक न राहता अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे .हे यश विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे.शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन केले, शंका समाधानासाठी विशेष वर्ग घेतले,अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण केले.यामुळे संपूर्ण शाळेचा निकालही उत्तम लागला आहे. शिवानीसारख्या विद्यार्थिनींच्या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळेल,आणि ती भविष्यात आपल्या कर्तृत्वाने गावाचे आणि समाजाचे नाव उज्वल करेल,अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.
