कॅन्सर मुक्त ताडोबा साठी मॅरथॉन च्या माध्यमातून A HAPPY MOUTH IS A HAPPY MIND संदेश....
चंद्रपूर :: सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर व ॲटपार व्हिजन फाउंडेशन नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 20/04/2025 रोजी सकाळी 6.00 वाजता जागतीक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जनतेमध्ये मौखिक आरोग्य विषयी जन-जागृतीकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय मोहर्ली ते आगरझरी गेट पर्यंत मॅरथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात डॉ. संदीप पिपरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर, यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय मोहर्ली येथे उपस्थितांना तंबाकू मुक्त जीवनाची शपत दिली. मा. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ता. अं.व्या. प्र., चंद्रपूर यांचे हस्ते हिरवी झेंडी देऊन मॅरथॉन सुरुवात करण्यात आली व आगरझरी गेट येथे प्लास्टिक मुक्त ताडोबा करण्याकरिता शपत देऊन सदर कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये मा. कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ता.अं. व्या. प्र., चंद्रपूर, मा. आनंद रेडी, उपसंचालक (कोर), श्री. संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादे.), डॉ. संदीप पिपरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी सामान्य रुग्णालय चंद्रपूर, डॉ. आकाश कासटवार, दंत शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर, डॉ. नितिन जनबंधू, दंत शल्य चिकित्सक, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, डॉ. सुप्रिया वाघमारे, डॉ. रोमल शेंडे, डॉ. दिपशिखा मुसळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर. सचिन जुमडे, दंत सहाय्यक, सुरज राय, अरविंद आंबुलकर, दंत तंत्रज्ञ, प्रशांत मरस्कोल्हे, दंत आरोग्य, एस. डी. जुमडे, पी. पी. ढाले, क्षेत्र सहाय्यक, तसेच मोहर्ली परिक्षेत्रातील सर्व वनरक्षक, चारूल परिहार सह आदी उपस्थित होते. झिरो वेस्ट मॅनेजमेंट, मोहर्ली, पर्यटन व्यवस्थापक, PRT सदस्य यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य तथास्तु रोसोर्ट मोहर्ली यांनी केले.
