तू दिसता या गाण्याची तरुण मनांवर भुरळ....
ब्रम्हपुरी :: नुकतच पॅनोरमा मराठी म्युजिक यूट्यूब चैनल वरती प्रदर्शित झालेलं "तू दिसता" मन बावरे झाले हे गाणं सध्या चांगलेच वायरल होत आहे. ब्रह्मपुरी च्या कलाकारांनी छाप पाडलीं गाण्यांची निर्मीती व गीतकार डॉ. रीना धनपाल बागडे, सहनिर्माते इंजि. भूषण रामटेके,सहनिर्माते व गाण्याचे संगीतकार जगदीश गोमिला हे सर्व ब्रह्मपुरी येथील आहे.
इंडियन आयडल फेम आशिष कुलकर्णी यांनी गोड आवाज दिलाय एखाद्याला प्रेमाची चाहूल अशी लागते व तो आपल्या स्वप्नांच्या दुनियेत रमतो याचे चित्रन नॅशनल स्कूल ड्रामा मधून शिकून आलेला दिग्दर्शक सौरभ गुरु यांनी केला तर प्राची मंगल, शुभम उगले या कलाकारांनी आपल्या हावभावातून प्रेम, आणि त्याची धडपड सुंदर असं वर्णन या गीतातुन मांडला गेला आहे.
याचे संपूर्ण चित्रीकरण जवळच असलेल्या ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, मिनीघरी, घोडाझरी, खडकी, परिसरात झाला या गाण्यासाठी कॅमेरा अजय व विजय ढोके, अमीत पुरकाम, वेशभूषा विकास चहारे , अभिनव कात्यायन ,शरद अंबादे ,विशेष सहकार्य केले हे गाणं सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे. या संपूर्ण टीमला शुभेच्छा, त्या गाण्यावर नृत्य रील तयार करून सोशल मिडिया वर करीत आहे धुमाळ. संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
