समिधा सेवा संस्था नागभीड द्वारा संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे सुयश....
नागभीड :: आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय देसाईगंज वडसा येथे राज्यस्तरीय डुएट डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये समिधा सेवा संस्था द्वारा संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीडच्या विद्यार्थिनी संजना मुळे व मुन्नी दिघोरे या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता तेथील त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये त्यांना सन्मान म्हणून प्रशस्तीपत्रक व गुलदस्ता देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यादवराव पोशट्टीवार कला व विज्ञान महाविद्यालय तळोधी बाळापुर येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठ स्तरीय वकृत्व स्पर्धेच्या आयोजनात सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पूजा वीर तसेच विशाखा ठाकरे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता प्रस्तुत स्पर्धेमध्ये यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांचा सन्मान म्हणून रोख 1001 रुपये, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व गुलदस्ता देऊन गौरविण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व महाविद्यालयाला यश मिळवून दिले त्यांच्या यशाबद्दल समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा जीभकाटे तसेच समस्त प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंदानी सर्वांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल अभिनंदन केलेले आहे व त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.
