Top News

नागभीड येथील रा. म. गांधी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची आय. आय. टी. जाम परीक्षेत भरारी...

नागभीड येथील रा. म. गांधी महाविद्यालयातील  दोन  विद्यार्थ्यांची आय. आय. टी. जाम परीक्षेत भरारी...


नागभीड ::   स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय , नागभीड येथील विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र  विषयात  आय. आय. टी. जाम परिक्षा उत्तीर्ण करुन महाविद्यालयाच्या यशाची  परंपरा कायम ठेवली.

सविस्तर वृत्त असे आहे की, स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील बि . एस्सी . तृतीय वर्षाचे  विद्यार्थी कु. प्राची लोकाचंद ढोक व प्रज्वल अण्णाजी खोब्रागडे  यांनी  रसायनशास्त्र  विषयात  आय. आय. टी. जाम परिक्षा उत्तीर्ण करुन महाविद्यालयाच्या यशाची  परंपरा कायम ठेवली आहे.

  महाविद्यालयात बि. एस्सी. प्रथम वर्षाला  प्रवेश घेतला तेव्हापासुन त्यांना आय. आय. टी. जाम परीक्षेबद्दल  विद्यार्थ्यांना जागृत केले जाते. विद्यार्थ्यांना लागणारी साहित्य, पुस्तके व मार्गदर्शन महाविद्यालयातर्फे दिल्या जातात. महाविद्यालयात नियमित वर्ग  घेतले जाते त्यामुळेच या वर्षी सुद्धा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  परिक्षेत यश संपादन केले. 

कु. प्राची लोकाचंद ढोक व प्रज्वल अण्णाजी खोब्रागडे  यांनी आय. आय. टी. जाम परिक्षा पास केल्याबद्दल संस्थेचे सचिव मनोज वनमाळी यांनी अभिनंदन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . जी. डी. देशमुख यांचे हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या यशात महाविद्यालयाचे  सहाय्यक  प्राध्यापक व आय. आय. टी. जाम  समन्वयक डॉ . अतुल नागपुरे  यांचे अथक परीश्रम व मार्गदर्शन तसेच  विद्यार्थ्याची इच्छाशक्ती यामुळेच त्यांना यश प्राप्त झाले. पालकांनी सर्व शिक्षकांचे व महाविद्यालयाचे आभार मानले .

 विद्यार्थ्यांनी  आपल्या यशाचे श्रेय डॉ. अतुल नागपुरे, प्रा. निलेश गोडे, डॉ. विकास मोहतूरे, प्रा. प्रेमकुमार खोब्रागडे, प्रा. प्रचल ढोक,  डॉ. राजेंद्र चव्हाण,  डॉ. आर. जे. रुडे,  डॉ. मनिश मत्ते, डॉ. अंकुश कायरकर  प्रा. चक्रधर भुर्रे, व  प्रा. धनंजय मडावी तसेच इतर प्राध्यापकवृद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना दिले.

📲 बातमी, लेख, कविता व जाहिराती करिता संपर्क साधा :: मुख्यसंपादक तथा संपादक - पराग गुंडेवार 8668781673


Previous Post Next Post