Top News

छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन मर्दानी खेळ हाच खरा भारतीय खेळ - गणेश तर्वेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन मर्दानी खेळ हाच खरा भारतीय खेळ - गणेश तर्वेकर 



आष्टेडू मर्दानी आखाडा राज्यस्तरीय निवड स्पर्धा संपन्न


 



बल्हारशाह ::  दिनांक 27/7/2024 ला तालुका क्रीडा संकुल, बल्हारशाह  येथे चंद्रपूर जिल्हा  आष्टेडू मर्दानी आखाडा अंतर्गत  क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते दीपप्रज्वन करून करण्यात आले. या प्रसंगी आष्टेडू आखाडा चे अध्यक्ष महागुरू राजेश तलमले  व तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले भाजपा शहर सचिव इंजि.देवेंद्र वाटकर,आष्टेडू मर्दानी आखाडा चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष गणेश तर्वेकर,जिल्हा सचिव गणेश लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. हा खेळ शिवकालीन प्राचीन खेळ असून शालेय खेळामध्ये व विद्यापीठा मध्ये  सुद्धा समाविष्ठ करण्यात आलेला आहे. यामध्ये,लाठी,तलवार,बाणा, दानपट्टा या खेळाचा प्रचार व प्रसिद्धी व्हावी म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. व होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धे करीता ,सदर स्पर्धेचे आयोजन  आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन, बल्हारशाह  च्या वतीने करण्यात आले होते.आयोजकान मध्ये अध्यक्ष गुरु गुलाम अहमद शेख, गुरु मनोज डे, गुरु प्रशांत पिंपळे, गुरु सिंधू कुशवाह , गुरू-स्वप्नील डंबारे, स्पर्धेचे संचालन गुरु सिंधू कुशवाह यांनी केले आभार प्रकट  गुरु गुलाम अहमद शेख  यांनी केले. या स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील ब्रम्हपुरी, बल्हारशाह ,नागभीड,चिमूर,चंद्रपूर, मूल,व इत्यादी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता .या स्पर्धेत, जवळपास 300 ते 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Previous Post Next Post