सर्व समाजातील गरजवंतांना आरोग्य सेवा उपलब्ध. - नंदकुमार गादेवार.
नांदेड :: महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागाचा उद्घाटन सोहळा नुकताच नांदेड येथे पार पडला महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार व डाॅ. रचिता बिडवई यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
सर्व समाजातील प्रत्येक गरजवंत घटकाला 50 रुपयांत नाममात्र दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटल बाह्य रुग्ण विभाग ओपीडी दिनांक १ जून रोजी सुरू करण्यात आला आहे.
पहिल्याच दिवसापासून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रचिता बिडवई तर उद्घाटक म्हणून महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार हे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये दिलीप कंदकुर्ते, सुभाषराव कन्नावार, एकनाथ मामडे, माधुरी कोल्हे, सुलभा वट्टमवार, बबिता आष्टीकर, अनिल मनाठकर, भानुदास वट्टमवार, डॉ. नरेश रायेवार, शंतनू कोटगिरे, डॉ. विठ्ठलराव फड, डॉ. रमेशराव मुत्तेपवार, डॉ. नंदकुमार बिडवई, डॉ. राम चिद्रावार, डॉ. व्यंकटेश दुबे, डॉ. प्रल्हाद गादेवार, डॉ. संतोष शिरसीकर, डॉ. राघवेंद्र चालिकवार, डॉ. संजय मनाठकर, डॉ. सतीश मामीडवार, डॉ. पांडुरंग गंजेवार, डॉ. शुभांगी मनाठकर, डॉ. सागर कोटलवार, डॉ. सागर राहेगावकर, डॉ. संदीप शक्करवार, डॉ. अरविंद रायेवार, डॉ. स्वप्नील दूध दुदलवार, डॉ. गोपाळ चक्रवार, डॉ. गंगाधर पोलावार, डॉ. पी सुदर्शन, डॉ. रमेश नारलावार, डॉ. सुरेश गादेवार, डॉ. राहुल महाजन, डॉ. पियुष तम्मेवार, डॉ. भास्कर जनावार, डाॅ. सुरेश गादेवार, डॉ. दिनेश प्रतापवार, डॉ. सेजल महाजन, डॉ. नीता रायेवर, डाॅ. प्रवीण गादेवार, डॉ. सुचिता फेकमवार, डॉ. शेफाली तुप्तेवार, डॉ. वैशाली कोटगिरे, डॉ. अंजली मद्रेवार, डॉ. श्रुती कोटलवार, डॉ. वैदही चिद्रावार, डॉ. आर डी मुखेडकर, दिलीप मनाठकर, प्रणिता श्रीनिवार, सुधीर चिंतावार, सीए राहुल जिल्हेवार, सुभाषराव कन्नावार, प्रदीप कोकडवार, विजयकुमार कुंचनवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, यांच्यासह महासभेचे राज्य व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगीत महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी सर्व समाजातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना आरोग्यसेवा देण्यासाठी महासभेच्या वतीने श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटल ओपीडी विभाग सुरू करण्यात आल्याचे सांगून लवकरच नांदेड या ठिकाणी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले आहे. डॉ. नरेश रायेवार, डॉ. रचिता बिडवई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बंडेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार यांनी मानले आहे.
