Top News

नागभीड शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यामध्ये नियुक्ती.....

नागभीड शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कंपन्यामध्ये नियुक्ती.....

 


नागभीड ::  राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथील महाविद्यालयाच्या  'कौशल्य वृद्धिंगत  कार्यक्रमांतर्गत (Skills Enhancement Program) महाविद्यालयातील  विद्यार्थी  क्षितिज कोहले, हर्षल गजपुरे यांची आंतराष्ट्रीय स्तरावरील लुमाक्स  कंपनी पुणे येथे  तसेच  कु. अस्मिता चौधरी, कु. मानसी पांगुळ, कु. रजनी चिलबुले, कु. वैष्णवी चिलबुले यांची आंतराष्ट्रीय स्तरावरील जाबिल कंपनी, पुणे येथे  नियुक्ती झाली.

महाविद्यालयात राबविलेल्या टी. सी. एस च्या युवा रोजगार कार्यक्रमांतर्गत (TCS Youth Employment  Program ) महाविद्यालयातील  विद्यार्थी कु. श्रावणी देशमुख आणि कु. श्रावणी कावळे यांची टी सी एस  कंपनी नागपूर येथे  निवड झाली.       

महाविद्यालयात  बीएससी व बी ए  प्रथम ला प्रवेश घेतला तेव्हापासून विद्यार्थ्यांना नौकरीच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाते व विद्यार्थी कसे कौशल्य आत्मसात करून रोजगार प्राप्त करतील या कडे कटाक्षाने लक्ष दिले जाते त्याचाच परिणाम की आज महाविद्यालयाचे दहा ते पंधरा विद्यार्थी विविध कंपनीमध्ये नौकरी करीत आहेत .  

विद्यार्थ्यांची निकुक्ती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव  मनोज वनमाळी व संस्थेचे संचालक मंडळ तसेच  प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद  कौशल्य विकास कार्यक्रम अधिकारी डॉ. मनीष मते, कौशल्य विकास सहकार्यक्रम अधिकारी प्रा. धनंजय मडावी, डॉ. विकास मोहतूरे, डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. आर. जे. रुडे, प्रा. निलेश गोडे, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. चक्रधर भुर्रे  व महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांना दिले.


बातमी जाहिरात कविता चारोळी करिता संपर्क :: पराग सुरेश गुंडेवार - मुख्यसंपादक तथा संपादक  8668781673

Previous Post Next Post