बल्लारशाह शहरातील प्रभाग क्रं १ व २ येथिल उघड्या नाल्या चेंबर ने झाकण्यात याव्या....निवेदनातुन मुख्याधिकारी यांचा काळे मागणी.....
बल्लारशाह | उपसंपादक | गौतम कांबळे | :: बल्लारशाह शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ येथिल काही नाल्या चेंबर ने झाकून नसल्याने पावसाळ्यात होणाऱ्या संततधार पावसामुळे तुडुंब भरून सर्वत्र दुर्गंधी रस्त्यावरून वाहत जाते याचा नाहक त्रास येथिल स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे, तसेच अतिवृष्टी मुळे तुडुंब भरलेल्या ह्या नाल्या नागरिकांच्या लक्षात येत नसल्याने येथे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी मुख्याधिकारी न.प. बल्लारशाह यांना निवेदन देऊन या विषयाचा गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर समस्या सोडविण्यासाठी सक्रियतेने पावले उचकत यातून मार्ग काढावा अशी विनंती केली या वेळेस उपस्थित भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहर कार्याध्यक्ष सुरज चौबे, मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले, सौरभ मुत्यालवार सह अन्य उपस्थित होते.
