Top News

बल्लारशाह शहरातील अवैध्यरीत्या सुरू असलेले मंगल कार्यालय व लॉन तात्काळ बंद करा. - प्रशांत झांमरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग.

बल्लारशाह शहरातील अवैध्यरीत्या सुरू असलेले मंगल कार्यालय व लॉन तात्काळ बंद करा. -  प्रशांत झांमरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्याय विभाग.



बल्लारशाह ::  बल्लारशाह शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून मंगल कार्यालय व लॉन् अवैधरित्या सुरू आहेत. हे मंगल कार्यालय व लोन बनवायची कुठलीही परवानगी  बल्लारशाह नगर परिषदेकडण घेतलेली नाही तसेच नकाशा पास करून घेतला नाही. तसेच त्यांच्याकडे  पार्किंग सुद्धा नाही. लग्नसमारंभ असले की सर्व गाड्या रस्त्यावरती लावत असतात त्यामुळे बल्लारशाह शहरातील रहदारीत सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण होत तसेच त्यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. या होणाऱ्या अपघात अशी जबाबदारी कोणाची?

जे मंगल कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये फायर एक्झिट सुद्धा नाही. हे सर्व मंगल कार्यालय आणि लॉन तात्काळ बंद करण्याची सूचना मुख्य अधिकारी नगरपरिषद बल्लारशाह यांना देण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांना देण्यात आले.

 निवेदन देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे तथा जिल्हा उपाध्यक्ष रतन फुलकर,जिल्हा सचिव दर्शन मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बल्लारपूर शहराचे कार्याध्यक्ष सुरज चौबे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बबलू बोराडे,सामाजिक कार्यकर्ता मनोज बालमवार उपस्थित होते.

Previous Post Next Post