Top News

Weather update :: पुन्हा जोरदार पाऊस

विदर्भ आणी मराठवाडा साठी पुढील 3 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा नवा अलर्ट





नागपूर  ::  हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

नुसता पाऊसच पडणार नाही तर वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग प्रति तास 30-40 कीमी इतका असू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.



दिलासादायक बाब म्हणजे जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी कुठेही गारपिटीचा इशारा देण्यात आलेला नाहीये.

दरम्यान एकीकडे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मात्र दुसरीकडे अजूनही काही भागात उष्णतेची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात अकोला आणि सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या दोन शहरात आज 44. 3 सेल्सिअस अंश एवढं तापमान नोंदवण्यात आलं आहे.

मुंबईबाबत बोलायचं झाल्यास आजही मुंबई आणि उपनगरात हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Previous Post Next Post