Top News

CBSE बोर्डाचा दहाविचा निकाल जाहीर

CBSE बोर्डाचा दहाविचा निकाल जाहीर


श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड चा निकाल 98.5  टक्के...


यंदाही मुलीच आघाडीवर......उत्कृष्ठ निकालाची परंपरा ठेवली कायम...



नागभीड ::  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा परीक्षेत 98.5 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड इथुन सीबीएसई बोर्डाच्या दहाविच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदाही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
कु. कुमुद मुखरू कुर्झेकर हिने 94. 4 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवीला आहे , कु. स्मिता अमृत शेंडे हिने 90.4 टक्के गुण मिळवत व्दितीय क्रमांक मिळवीला असून कु. हिना चंदू गडेकर हिने 81.4 टक्के  गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवीला आहे. कु. वैधही कैलास तीतीरमारे हिने 76.8 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळवीला आहे. कु. मनस्वी प्रमोद भुर्ले हिने 76.4 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवला आहे. कु.हरीष नंदु दडमल याने 74.40 टक्के मिळवत  सहावा क्रमांक मिळवीला आहे. कु. अथर्व भुपेंद्र अमृतकर याने 74.2 टक्के गुण मिळवून सातवा क्रमांक मिळवला आहे.
कु. प्रेरणा दिलीप आळे हिने 73.40 टक्के गुण मिळवत आठवा क्रमांक मिळवीला आहे. कु. वंश विलास ऊरकुडे याने 73 टक्के गुण मिळवत नव्वा क्रमांक मिळवला आहे. कु. युग जगजीवन राऊत याने 71.4 टक्के गुण मिळवत दहावा क्रमांक मिळवला आहे.  तर श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड ने दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली असून संपूर्ण शाळेचा निकाल हा 98.5 ट्टके लागला आहे.
समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर , सचिव  अजय काबरा  , स्कूल च्या प्राचार्या सौ. शुभांगी पोहेकर  , मुख्याध्यापिका श्रीमती संगीता नारनवरे  यांच्या सह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Previous Post Next Post