Top News

Big Breaking :: वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट बल्हारशाह वन विभागाच्या सतर्कतेने उघडकीस....

Big Breaking :: वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट बल्हारशाह वन विभागाच्या सतर्कतेने उघडकीस....


बल्लारशाह वन विभागाची मोठी कारवाई.....वन्यप्राण्याची शिकार करून मासाची विक्री करतांना टोळीला मुद्देमालासह केले अटक....




बल्हारशाह - गौतम कांबळे :: उपसंपादक 8605011881 :-  दिनांक 07 मे 2024 ला अवैधरित्या रानडुक्कर (जंगली वराह) या वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करीता वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. 

माहितीच्या आधारे बल्हारशाह  शहरातील सास्ती पुलीया परिसरात सापडा रचुन आरोपी श्रीकृष्ण गुलाब पवार, रा. हिरापुर, सदाशिव भास्कर देवगडे, रा. हिरापुर, वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारशाह व तोमरय्या राजेय्या धोबल्ला, रा. बल्हारशाह यांना रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास 10 कि.ग्रा. सह ताब्यात घेतले. वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता ते रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास विक्री करीत आणल्याची त्यांनी कबुली दिली. 

हे ही वाचा 👉🏻 Big Breaking : चंद्रपूरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात.....

त्यांनतर मास विकत घेणारे आरोपी सुनील सदाशिव तुमराम, रा. महात्मा गांधी वार्ड बल्हारशाह, सावण सोजन बरसे, रा.गोकुलनगर वार्ड बल्हारशाह व जाणी पोचम गाजुल्ला, सुभाष नगर वार्ड बल्हारशाह यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी आरोपी वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारशाह यांचे कडुन वन्यप्राण्याचे मास विकत घेत असल्याबाबत सांगितले असता वरील सर्व आरोपी 1 ते 7 विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44, 51 व 52 अनव्ये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08962/224045 दिनांक 07.05.2024 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले 2 मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम 16810.00 जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला.

हे ही वाचा 👉🏻 Big Breaking : चंद्रपूरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात.....

 या कार्यवाही मुळे वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट उघडकीस आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहयोगक, ए.एस. पठाण, के.एन. घुगलोत, बी.टी.पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, श्रीतानाजी कामले, देव आकाडे,  सुनील नन्नावरे, धमेंद्र मेश्राम,एस.आर.देशमुख, ए.बी. चौधरी, एस.एस. नैताम यांनी स्वत: केले. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

हे ही वाचा 👉🏻 Big Breaking : चंद्रपूरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक एसीबी चा जाळ्यात.....


Previous Post Next Post