Top News

शिक्षणाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी....

शिक्षणाची वारी विद्यार्थ्यांच्या दारी....नवागत विद्यार्थींची बैलगाडीतुन मिरवणूक




आर्णी : हिरासिंग राठोड - तालुका प्रतिनिधी +919511729176 :: 

 


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त स्व.सजनीबाई आडे व श्री. शिवाजीराव मोघे वि.जा. भ. ज. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा महाळुंगी तर्फे शाळा पूर्व तयारी उपक्रमांतर्गत प्रवेशोत्सव वारी राबवत, शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन विद्यार्थ्यांना तथा पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून त्यांना शिक्षणाप्रति जागृत करण्यात आले,

यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याच स्वागत करत त्यांना बैलगाडीत बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली, आणी कार्यक्रमाची सांगता म्हणून शाळेच्या परिसरात, पालकांचा मेळावा घेऊन आभार मानण्यात आले, व विद्यार्थ्यांना चॉकलेट रुपी खाऊ वाटप करण्यात आले या सदर उपक्रम प्राचार्य बि. यु. राठोड, मुख्याध्यापक प्रकाश लडके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपस्थितीत

  शिक्षक राऊत, बि. के राठोड, होलगरे, के.डी चव्हाण, मालगडे सर, एम.टी चव्हाण, सोनवणे, आडे, राठोड, महिला शिक्षीका देशमुख, जाधव, राठोड यांनी पार‌पाडले उपक्रमाच्या यशस्वीते करीता अंकुश लव्हाळे, उमेश कांबळे यांनी अथक परीश्रम घेतले‌.



Previous Post Next Post