Top News

अवकाळी पावसामुळे जेवरा येथील अनेक घरांचे छते टीन उडाले व घराच्या भिंती इलेक्टिक पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान.....

अवकाळी पावसामुळे जेवरा येथील अनेक घरांचे छते टीन उडाले व घराच्या भिंती इलेक्टिक पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान.....


शासनाने त्वरित मदत करावी नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष यांची मागणी....



कोरपना - नितेश केराम : तालुका प्रतिनिधी  ::  कोरपना तालुक्यातील  जेवरा येथे दि 7/5/24 रोज मंगळवार दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान हवा धुंद मेघागर्जनासह पावस हवा धुंद व गारा सह अवकाळी पावसाने कहर केला अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले टीन, कवेलू,भिंती इलेक्ट्रिक पोल पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


मात्र जीवित हानी नाही परंतु या मध्ये दोन महिला किरण विठ्ठल गेडाम, निताबाई सुधाकर भोयर त्यांच्या डोक्याला मार लागला असून गँभीर रित्या जखमी झाल्या आहे व त्यांच्या डोक्याला पाच सहा टाके बसले आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावातील घरांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे.



 नागरिकांच्या घरांचे पंचनामे  जातीने लक्ष देऊन तहसीलदार यांनी करून शासनाच्या वतीने त्वरित मदत देण्यात यावी अशी मागणी  भाजपा चे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर कोरपना तसेच भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्तेनी केली आहे. यावेळी गावातील नागरिक बंडू गोंड, शेख मोहंमद, आशिक शेख, मेगशाम गोंड, विठ्ठल गेडाम, सुधाकर भोयर, आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक पुरुष महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post