Top News

बल्हारशाह पोलिसांची मोठी कारवाई.....मोठ्या प्रमानात दारुसाठा जप्त

बल्हारशाह पोलिसांची मोठी कारवाई.....मोठ्या प्रमानात  दारुसाठा जप्त  





बल्हारशाह (ता.प्र.) :- बल्हारशाह  येथे लाखोचा दारू साठा अवैध रीत्या वाहतुक करित असतांना पकडला उल्लेखनीय कामगिरी अशी की, प्रोव्हि रेड दरम्यान  पेट्रोलिंग करित असता  बल्हारशाह  पोलीसांना दिनांक -२७/०४/२०२४ चे रात्री २१/०० वा.  विसापुर रोड वर किल्ला वॉर्ड बल्हारशाह येथे रेड केली.

 एकुण १५ पेट्या रॉयल स्ट्रॅग १८० एम.एल., ५ पेट्या रॉयल स्ट्रॅग ९० एम.एल., १० पेट्या रॉयल स्ट्रॅग ३७५ एम.एल., ३ पेट्या रॉयल स्ट्रॅग १ लिटर, ५ पेट्या रॉयल स्ट्रॅग २ लिटर व म्यागन्म बिअर ५ पेटी ६५० एम.एल. व ५ पेटया आय.बी.१८० एम.एल. असे एकुण ४८ पेट्या दारुचा माल कि.अं.३,७०,०००/-रु. व टाटा एस गाडी क्रं. एम.एच.३४ ए.बी. ५८०१ कि.अं.४,००,०००/-रु. असा एकुण- ७,७०,०००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला. 

आरोपी नामे -१) राकेश अरुण मामेडवार वय-३७ वर्षे रा. बाबुपेठ नेताजी चौक चंद्रपुर जि. चंद्रपुर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक  मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु ,  दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पोहवा. संतोष दंडेवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, आंनद परचाके, सुनिल कामटकर, पो.अं. शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

Previous Post Next Post